Sat. Feb 29th, 2020

‘एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहोत’ मुख्यमंत्र्यांचा टोला

नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray inaugurates Nagpur Metro) यांच्या हस्ते झालं. लिंकद्वारे मुख्यमंत्र्यांनी हे उद्घाटन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण एका गाडीत बसू शकलो नाही, तरी एका स्टेशनवर आलो आहोत, अशी मिश्कील टीपण्णी केली.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

‘आज आपण एका गाडीत बसू शकलो नाही, तरी एका स्टेशनवर आलो आहोत’ अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी युती तुटल्यावर सत्तेबाहेर राहिलेल्या भाजपला चिमटा काढला.

राजकारणी म्हटलं की श्रेयवाद येतोच. मात्र, आम्हाला श्रेय नको, तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे नागपुरातील प्रकल्प कधीच थांबवले जाणार नाहीत, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.

आपण जनतेचे सेवक आहोत.  त्यामुळे नागपूर मेट्रोला (Nagpur Metro) दिलेलं ‘माझी मेट्रो’ हे नाव योग्य आहे.

या मेट्रोची (Majhi Metro) निगा राखणं हे आपलं काम आहे.

जर योग्य निगा राखली तर महाराष्ट्रातील मेट्रो (Nagpur Metro Phase II) पाहण्यासाठी परदेशातूनही लोक येतील.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणापूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी राज्यात यापूर्वी असलेल्या भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. तसंच महाविकास आघाडीच्या सरकारनेही आपल्या विकासकामांचे प्रस्ताव पाठवावे, असं आवाहन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *