‘तेच ते नि तेच ते..!’ अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरेंची सामनातून टिका
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महिलावर्गाच्या पदरी निराशा आणि नोकरदारांचा अपेक्षाभंग करणारा अर्थसंकल्प असल्याची टीका सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलीय.
स्वप्ने विकून सत्तेत आलेल्या केंद्रीय सरकारने पुन्हा एकदा स्वप्नांचाच भुलभुलैया देशातील जनतेसमोर ठेवला आहे.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी लोकसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पात जुनीच स्वप्ने आणि जुन्या घोषणा असल्याची बोचरी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केलीय.