कोरोनाच्या संदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री ?
कोरोनाच्या संदर्भात आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला

कोरोनाच्या संदर्भात आज पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थीतीबाबत माहीती दिली. राज्यात कोरोना झालेले 26 पुरूष आणि 14 महिला रूग्ण आहेत, तर नागरीकांनी काळजी घ्यावी आणि सरकारला सहकार्य करावे असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. तर मुंबईची लोकलसेवा आणि बससेवा बंद करणार नाही असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणालेत.
आणखी काय म्हणाले उद्धव ठाकरे बघुयात…
- गरज असेल तर घराबाहेर पडा
- अनावश्यक दुकाने बंद ठेवा
- पुढील 15 दिवस राज्यासाठी महत्वाचे
- गर्दी कमी झाली नाही, तर लोकल बंद करावी लागेल
- सरकारी कर्मचाऱ्यांना 7 दिवस सुट्टी नाही
- सरकारी कार्यालयातील उपस्थिती 50 टक्क्यावर आणणार
- सुचनांचे पालन केल्यास धोका टळू शकतो
- सर्वधर्मीयांना धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचे आवाहन
- खासगी लॅबला सध्या परवानगी नाही