Sat. Jul 11th, 2020

आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो – उद्धव ठाकरे

मुंबई : महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडींमध्ये नवा ट्विस्ट आला आणि भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादीमधून फुटून अजित पवार देखील उपमुख्यमंत्री झाले. यासंदर्भात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत यापुढील लढाई शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच लढणार असल्याचं जाहीर केलं.

शरद पवारांनी काय म्हटलं?

राज्यपालांनी सकाळी शपथविधी घेतला याचं आश्चर्य वाटतंय.

मात्र राष्ट्रवादीचे आमदार भाजपसोबत जाणार नाहीत

भाजपसोबत जाणाऱ्या आमदारांचं सदस्यत्व धोक्यात

मी अशा प्रसंगातून पूर्वीही गेलोय.

1980 सालीही माझे आमदार फुटले होते.

अजित पवार यांनी मला कोणतीही कल्पना दिली नव्हती.

त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल.

उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

आम्ही जे काही करतो ते उघड उघड करतो.

तुमचा कारभार ‘रात्रीस खेळ चाले’ असा, भाजपला टोला.

लोकशाहीचा खेळ चाललाय.

मी जाणारच नाही, असं म्हणा आता.

यापुढे निवडणूका घेऊ नका.

तुम्ही माणसं फोडता, आम्ही उघड करतो.

हरयाणा, बिहारमध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात झालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *