“मला लोकांना ‘मांत्रिका’च्या तावडीतून सोडवायचं आहे”- उद्धव ठाकरे

“आदिवासी भागातील लोकांना मला मांत्रिकाच्या तावडीतून सोडवायचे आहे आणि तिथेही लोकांनाही मांत्रिकापासून सोडवायचे आहे” असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे थेट नाव न घेता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.
मोदीरोषाचा अध्याय सुरूच!
उद्धव ठाकरे यांनी आपला मोदिरोष अध्याय पुढे सुरु ठेवलाय… निमित्त होते माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी लिहिलेल्या ‘वास्तव कुपोषणाचे’ या पुस्तक प्रकाशनाचे.
नरिमन पॉईंट येथील ‘वाय बी चव्हाण सेंटर’ येथे सोमवारी सायंकाळी हा कार्यक्रम पार पडला.
आपल्यालाही कुणीतरी 2025 पर्यंतचा अंगारे-धुपारे देऊन मंत्र देतात.
त्यावरही आता आपल्यालाच उपाययोजना करायची आहे असेही ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले.
डॉ. दीपक सावंत यांच्या कामाची प्रशंसा केली.
त्यांना मंत्रिपदाची संधी पुन्हा का दिली नाही याचा खुलासाही ठाकरेंनी केला.
राज्यात पुढची सत्ता शिवसेनेचीच येणार असल्याने फार काळजी करू नका असं सांगत उद्धव यांनी डॉ. सावंत यांच्या राजकीय भवितव्यावर आलेलं मळभ दूर केलं.
या कार्यक्रमाला राजकारण, समाजकारण आणि प्रशासन अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉ. सावंत यांनी आपल्याला कुपोषण निर्मूलनाच्या कामादरम्यान आलेले अनुभव, प्रशासनाचा दृष्टिकोन आणि करावयाच्या उपाययोजनांची गरज भाषणात मांडली.