हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही सामनातून खडेबोल
हिंदुत्वच्या मुद्यावरून सामनातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा…

यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा हा बंद सभागृहात झाला असला तरी आपल्या भाषणातून शिवसेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व बद्दल जे विचार मांडले त्यावरून त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. या कारणाने त्यांचे भाषण चांगलेच गाजले.
आज “दोन सडेतोड तोफखाने” शीर्षकाखाली सामनामध्ये अग्रलेख लिहून शिवसेनेने भाजपला हिंदुत्व वरून चांगलाच टोला लगावला.
हिंदुत्व हे थाळ्या, घंटा बडवण्यापुरते नाही तसे दाढी-मिश्यांपुरते मर्यादित नाही. चापेकर बंधूंना दाढी नव्हतीच, पण तीनही चापेकर बंधू हसत हसत देशासाठी फासावर गेले. अशा मर्दानगीची अनेक उदाहरणे आहेत. अश्या शब्दात सामनातून भाजपला शिवसेनेने खडेबोल लगावले आहे.
हिंदूत्व आपलीच मक्तेदारी समजणाऱ्या ठेकेदारांचे दात नागपुरात आपल्या भाषणातून सरसंघचालकांनी घशात घातले असे मत मांडून मोहन भागवत ह्यांचे हिंदुत्व वरील विचार आणि भाजपच्या काही नेत्यांचे हिंदुत्व बद्दलचे विचार ह्यात तफावत असल्याचे दाखवून दिले आहे.