Fri. Mar 5th, 2021

बेस्ट CMच्या यादीत उद्धव ठाकरेंच नाव…

देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली असून देशाचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न हा एबीपी न्यूज केला. एबीपी न्यूज आणि सी-व्होटरने सर्वेक्षणातून समोर आलं आहे की, पहिल्या पाच बेस्ट सीएमच्या यादीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांचं नाव आलं आहे. शिवाय यामध्ये भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याच्या नावाचा समावेश नाही.

या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहे. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, तिसऱ्या स्थानी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, चौथ्या स्थानी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन आणि पाचव्या स्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत. तर मुख्यमंत्र्यांपैकी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत यांना राज्यातील जनतेने कमी पसंती दर्शवली असून या तिन्ही मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता कमी ठरली आहे.

ओडिशा, दिल्ली, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारसहित तीन मोठ्या भाजपाशासित राज्यांची सरासरी लोकप्रियता राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राष्ट्रीय लोकप्रियतेच्या सरासरीपेक्षा अधिक चांगलं काम करत असल्याचं एबीपी न्यूजच्या सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

तसेच पाच सर्वाधिक खराब कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी थेटपणे भाजपाचे दोन मुख्यमंत्री आहेत तर भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असलेल्या एका मुख्यमंत्र्याचा समावेश आहे. म्हणजेच खराब कामगिरी करणाऱ्या पाचपैकी तीन मुख्यमंत्री भाजपाचे आहेत.
शिवाय तामिळनाडूमध्ये पलानीस्वामींना भाजपाचा अप्रत्यक्ष पाठिंबा आहे.

चांगली कामगिरी करणारे मुख्यमंत्री

  • (ओडिशा मुख्यमंत्री) नवीन पटनायक
  • (दिल्ली मुख्यमंत्री) अरविंद केजरीवाल
  • (आंध्र प्रदेश मुख्यमंत्री) जगनमोहन रेड्डी
  • (केरळ मुख्यमंत्री ) पी. विजयन
  • (महाराष्ट्र मुख्यमंत्री) उद्धव ठाकरे
  • (छत्तीसगड मुख्यमंत्री) भूपेश बघेल
  • (पश्चिम बंगाल मुख्यमंत्री) ममता बॅनर्जी
  • (मध्य प्रदेश मुख्यमंत्री) शिवराजसिंह चौहान
  • (गोवा मुख्यमंत्री) प्रमोद सावंत
  • (गुजरात मुख्यमंत्री) विजय रुपाणी

खराब कामगिरी करणारे मुख्यमंत्री

  • त्रिवेंद्रसिंह रावत (उत्तराखंड)
  • मनोहरलाल खट्टर (हरयाणा)
  • कॅप्टन अमरिंदर सिंह (पंजाब)
  • के. चंद्रशेखर राव (तेलंगाणा)
  • के. पलानीस्वामी (तामिळनाडू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *