Tue. Sep 29th, 2020

‘अजित पवारांचे अश्रू मगरीचे’ उद्धव ठाकरेंची दसरा मेळाव्यात टीका

शिवसेनेचा दसरा मेळावा आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर संपन्न झाला.यावेळी शिवसेनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.  शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. राम मंदिर या विषयावर शिवसेना ठाम असल्याचे उद्धव ठाकरे  यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

जगाच्या पाठीवर एकमेव व संघटना अशी आहे की, न चुकता विजयादशमी शिवतीर्थावर साजरी करते. गेली पन्नास वर्ष आपण ही परंपरा पाळत आहोत. विजयादशमी म्हणजे शस्त्रपूजा माझी शस्त्र ही महाराष्ट्रभर पसरलेली आहेत. विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी मी निघालेलो आहे.

असा क्वचितच योग येतो की, एका महिन्यात दोन विजयादशमी एक आज आणि दुसरी येत्या 24 तारखेला येणारी विजयादशमी. असे ते म्हणाले तसेच अवधूत गुप्ते आणि स्वप्निल बांदोडकर या दोघांनाही शिवसेनेचे गाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी म्हणजे रावणाचा प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला होता. म्हणजे राम होते, पण राम होते की नव्हते यावर वाद आहे. रामजन्मभूमी व प्रभू रामाचे मंदिर व्हावे ही शिवसेनेची मागणी आहे. रामाचे मंदिर ही संपूर्ण देशाची आणि हिंदूंची मागणी आहे. प्राण जाये पर वचन न जाये ही शिवसेनेची नीती आहे. हे आम्ही पाहतो आहे आणि पाळणार असे ते म्हणाले आहेत.

आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्र सारखा असेल एक वचनी. आम्ही वचनबद्ध आहोत. धनुष्यबाण ही निशाणी घेतली तेव्हा राम मंदिर हा विषयही नव्हता. रामाचे शिवधनुष्य हे शस्त्र घेऊन आम्ही मैदानात उतरत असतो. प्रकाशजी तुमच्या धनगराच्या काठी ला तलवारीची धार असली पाहिजे . अन्यायाच्या विरोधात लढणारी तलवार असली पाहिजे.

कोणाला वाटलं असेल की शिवसेना झुकली चंद्रकांत पाटील म्हणाले होते आम्हाला समजून घ्या घेतले समजून पण धनगरांना मराठ्यांना आरक्षण आम्ही द्यायला लावणार. या देशाचे मुसलमान जरी आपल्यासोबत आले तरी आम्ही त्यांना न्याय हक्क यांना न्याय देवू. शिवरायांचा महाराष्ट्र हाजी हाजी करणार नाहीये. शिवसैनिक हे माझी तलवार आहे. अन्यायापासून रक्षण करणारी ही ढाल आहे. समोरून आलिंगन देऊन पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या पोटाततून कोथळा काढणारी वाघनखे आहेत.

आपली ताकद काँग्रेसच्यापाठी कदापी उभी करणार नाही. शिवसेना वैर करेल तर उघड उघड करेल. शिवसेना कधीही कोणासमोर झुकणार नाही. एकतर मरेन किंवा मारायची शिवसैनिकाची जात आहे. देशद्रोहाचा खटला काढून टाकणाऱ्या काँग्रेसला पाठिंबा द्यायचा का ? जोपर्यंत आम्ही त्यांचे टारगेट आहोत तोपर्यंत आमचे देखील टारगेट तेच राहणार. असे ही ते म्हणालेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *