Thu. Nov 26th, 2020

‘त्या’ शिवसेना आमदारांवार उद्धव ठाकरे भयंकर चिडलेत

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता यावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 40 आमदारांना मराठवाडय़ातील निरनिराळ्या जिल्ह्य़ाची पाहणी करण्याच्या मोहिमेवर जाण्याचे

आदेश दिले होते.

 

जोडीला आजी-माजी नगरसेवक, संपर्कप्रमुखांची फौजही दिली होती. पण, 40 पैकी 27 आमदार तेथे पोहोचलेच नाहीत.

 

या प्रकारामुळे खवळलेल्या उद्धव ठाकरे यांनी कानउघाडणी केल्यानंतरही दांडीबहाद्दर आमदारांना काहीच फरक पडलेला नाही. या कामचुकार आमदारांची उद्धव ठाकरे आज शिवसेना भवनात

झाडाझडती घेणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *