Tue. Sep 29th, 2020

पंतप्रधान मोदी हे भावासारखे आहेत; उद्धव ठाकरेंची मवाळ भूमिका

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

एनडीएच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपसंदर्भात मवाळ भूमिका घेतली आहे. पंतप्रधान मोदी हे भावासारखे आहेत म्हणूनच मी त्यांना नरेंद्रभाई म्हणत आलो आणि केंद्र सरकार चांगलच काम करतंय असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केल्याचं समजतं. 

 

तसेच उद्धव यांना भाजपवर टीका टाळण्याचा सल्ला रामविलास पासवान यांनी दिला. तर दुसरीकडे भाजपनेसुद्धा सेनेबाबत मवाळ भूमिका घेतली. शिवसेनेसोबतचा वाद टाळण्यासाठी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघात भाजप आपल्या पक्षाच्या स्थापना दिवसाचा कार्यक्रम घेणार नाही.

 

भाजपचा स्थापना दिवस आणि आंबेडकर जयंतीनिमीत्त्यचे कार्यक्रम आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या मतदार संघातच करण्यात येणार आहेत.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *