Fri. Dec 3rd, 2021

खासदार उदयनराजे भोसले यांना जामीन मंजूर

जय महाराष्ट्र न्यूज, सातारा

 

खासदार उदयनराजे भोसलेंना सातारा जिल्हा न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे. उदयनराजेंना खंडणी आणि मारहाणीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

 

उदयनराजेंना अटक झाल्यामुळे साताऱ्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी त्यांना जामीन देण्यात

आल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, 7 ऑगस्ट रोजी खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे.

 

साताऱ्यातील लोणंद येथील उद्योगाच्या व्यवस्थापकाकडे खंडणी मागितल्याचा आरोप

लोणंदमधील सोना एलाईज कंपनीतील कामगारांचं वेतनवाढीसाठी आंदोलन सुरू आहे

उदयनराजेंच्या नेतृत्वाखाली कामगारांची संघटना आहे

उदयराजेंनी कंपनीच्या व्यवस्थापकांना सातारा विश्रामगृहात बोलावून खंडणी मागितली आणि बेदम मारहाण केली

कंपनीचे व्यवस्थापक जैन यांनी मार्चमध्ये पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *