उदयनराजे भोसले 14 तारखेला भाजपात प्रवेश करणार ?

विधानसभा निवडणुका काही दिवसांवर ठेपली असून विरोधी पक्षातील दिग्गज नेते भाजपा आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि खासदार उदयनराजे भोसले भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे चर्चा जोरदार सुरू आहे. मात्र उदयनराजे भाजपात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. येत्या 14 तारखेला दिल्लीत भाजपा प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.
उदयनराजे करणार भाजपात प्रवेश –
गेल्या काही दिवसांपासून उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करत असल्याचे चर्चा सुरू आहे.
गुरुवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
मात्र उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला राम राम करत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
येत्या 14 तारखेला दिल्लीत भाजपात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे.
तसेच 15 तारखेला होणाऱ्या महाजनादेश यात्रेत सामील होणार आहेत.
उदयनराजे यांच्या भाजपा प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे.