Fri. Jan 21st, 2022

पुतणीवर वाईट नजर, लिंगपिसाट काकाचा कहर

पुतणीवरील एकतर्फी प्रेमातून काकाने पुतणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे घडली आहे. आपल्या 16 वर्षांच्या पुतणीची हत्या केल्यानंतर काकाने स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

पुतणीचा लग्नाला नकार, काकाचा जीवघेणा प्रहार

मैनपुरी येथील बदनपुरी गावातील अनिल यादव याचं आपल्या पुतणीवरच एकतर्फी प्रेम होतं.

आपली सख्खी पुतणी असूनही यादव आपल्या 16 वर्षीय पुतणीशी लग्न करण्याची स्वप्नं पाहत होता.

पुतणीवर वाईट नजर असणाऱ्या यादवला कुटुंबातील सदस्यांनी अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला.

मात्र लिंगपिसाट अनिल यादव मात्र कोणतीही गोष्ट ऐकून घ्यायला तयार नव्हता.

तो पुतणीवर लग्नासाठी जबरदस्ती करतच राहिला.

शनिवारी पुतणी आपली आई आणि बहिणीसोबत आजीच्या घरी जात असताना अनिल यादवने त्यांना रस्त्यातच अडवलं आणि पुन्हा लग्नाची मागणी केली.

तिच्या आईने मध्ये पडत अडवायचा प्रयत्न केल्यावर चिडून तिच्याशी अनिल यादव भांडायला लागला.

यावेळी स्वतः पुतणीनेही आपण काकाशी लग्न करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत त्याच्या विकृत मनसुब्यांना झिडकारलं.

तेव्हा संतापलेल्या अनिल यादवने पुतणीच्या डोक्यात गोळी झाडून तिला ठार केलं. त्यानंतर त्याने स्वतःलाही गोळी घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला वेळेत रुग्णालयात नेल्यामुळे तो वाचला. हॉस्पिटलमध्येच पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. यावेळी आपल्या गुन्ह्याची कबुली त्याने स्वतःच पोलिसांना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *