कंगना आणि अर्णबच्या मुद्द्यावरुन फडणवीस सभागृहात आक्रमक
देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली ठाकरे सरकारवर जोरदार टीका…

मुंबई : हिवाळी अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी कंगना आणि अर्णब गोस्वामी यांच्या उल्लेख केला. शिवाय ठाकरे सरकारवर टीका करत म्हटलं.
“तुमच्या मनात येईल तसं घर तोडता येत नाही. हे कायद्याचं राज्य आहे, पाकिस्तान नाही. तानाशाही नाही तर लोकशाही आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. “सोशल मीडियावर या सरकारविरोधात एकही वाक्य लिहिलं तर तुम्हाला अटक झाल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती झाली आहे,” असं फडणवीस यांनी म्हटलं. जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा असं कोणी विरोधात लिहिलं तर कोणाला जेलमध्ये टाकलं नव्हत.
ही मुस्कटबाजी सुरु केली आहे. माझं आणि सुधीर मुनगंटीवार आमचं कार्टून आलं त्यावर गलिच्छ लिहिलं त्यावर कारवाई नाही, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. अर्णब गोस्वामी चुकीचे वागत होते तर ५० कायदे आपल्याकडे आहेत. याद्वारे कारवाई केली करू शकले असते मात्र बंद झालेली केस ओपन केली. सत्ताधारी नेत्यांना सुप्रीम कोर्टाची ऑर्डर वाचा असं म्हटलं शिवाय हायकमांड म्हणजे सुप्रीम कोर्ट नाही असं सुनावलं. यावेळी फडणवीस यांनी सुप्रीम कोर्टाचा दिलेला निर्णयही वाचून दाखवला.