भूमी पेडणेकरचा युनेस्कोला पाठिंबा

अभिनेत्री भूमी पेडणेकर नवनवीन आणि वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असते यावेळी भूमी ही #KeepGirlsInSchool या चळवळ सामिल होऊन मासिक पाळीच्या दिवसादरम्यानच्या स्वच्छतेबद्दल मुलींमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी काम करणार असून भूमीने युनेस्कोच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवला आहे. आयएएनएस या माध्यमसंस्थेच्या वृत्तानुसार, मासिक पाळीबद्दलच्या अज्ञानामुळे मुलींची शाळा बंद होणं आणि त्यांच्या स्वप्नांवर बंधनं येणं चुकीचं आहे. यासाठी मासिक पाळीबद्दल जागृती करणाऱ्या आणि मुलींना शिक्षण देणाऱ्या या चळवळीसोबत आपण काम करत असल्याचं भूमीने सांगितलं आहे.
मासिक पाळी ही गोष्ट नॉर्मल करून त्याबदद्ल मुलींना, महिलांना सुशिक्षित करणं गरजेचं आहे. केवळ या कारणासाठी मुलींची शाळा सुटू नये असं मतही तिनं व्यक्त केलं आहे. भूमी रुपेरी पडद्यावर अनेक चित्रपटात आपल्या नवीन अंदाजात प्रेक्षकांना भेटीला येते यावेळी भूमी ही वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. भूमीने आत्तापर्यंत तिने शुभमंगल सावधान, दम लगा के हैशा, बाला, टॉयलेट अशा समाजात उघडपणे न बोलल्या जाणाऱ्या विषयांवरचे चित्रपट केले आहे.