कोरोनाच्या नव्या विषाणूवरही प्रभावी ठरणार भारतात बनवलेली लस

सध्या जगरात कोरोनाचा कहर सुरू आहे यात आता एक दिलासादायक बातमी मिळाली आहे. भारतात तयार करण्यात आलेली कोरोनावरील लस नव्या विषाणूवरही प्रभावी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. शिवाय ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा विषाणू (न्यू स्ट्रेन) आढळल्यानं जगभरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या भारतात या नव्या विषाणूचे सहा रुग्ण आढळून आले असून आरोग्य मंत्रालयाच्या घोषणेनंतर सर्वांना दिलासा मिळाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे.