Tue. Sep 28th, 2021

‘राहुल गांधी मनोरुग्ण’ भाजपच्या मंत्र्यांची मुक्ताफळं!

भाजपचे अनेक मंत्री वादग्रस्त विधानांमुळे टीकेचे धनी झाले आहेत. त्यात केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांनी आणखी भर घातली आहे. मोदी यांची स्तुती करताना चौबे यांनी राहुल गांधी यांना चक्क वेडं ठरवलं.

राहुल गांधी यांना वेड लागलं असून त्यांना मनोरूग्णालयात पाठवा, अशी मुक्ताफळं केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री अश्विनी चौबे यांनी उधळली आहे.

नरेंद्र मोदी हे आकाशाएवढे उत्तुंग आहेत. त्यांच्यापुढे राहुल गांधी म्हणजे नाल्यातील किड्याप्रमाणे असं वादग्रस्त विधानही चौबै यांनी केलं.

चौबे यांच्या विधानावर चौफैर टिका होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *