मतदानासाठी अल्पसंख्याकांना धमकावल्याने मनेका गांधी अडचणीत

मतदान करण्यासाठी अल्पसंख्याकांना धमकावल्या प्रकरणी मनेका गांधी अडचणीत आल्या आहेत. मेनका गांधी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवार आहेत. मी निवडणूक जिंकणार असून तुम्ही मला साथ द्या. जर साथ दिली नाही तर जिंकल्यानंतर मी तुमच्याबरोबर काय करेन, बघा, अशी धमकी मनेका गांधी यांनी सुल्तानपूर येथे दिली होती. त्यामुळे त्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. सुल्तानपूरच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेनका गांधी यांना याप्रकणी नोटीस पाठवली आहे.
नेमकं प्रकरण काय ?
मनेका गांधी यांची सुल्तानपूरातील मुस्लिम बहूल येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मी निवडणूक जिंकणार असून तुम्ही मला साथ द्या.नाहीतर तुमचं खर नाही अशी धमकी या सभेत दिली.
तुम्ही माझ्यासोबत या, नाहीतर तुमचे काम मी करणार नाही, अशी धमकी दिली.असे ही त्या यावेळी म्हणाल्या आहेत.
मुस्लिम मतदारांना धमकी दिल्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मी माझ्या फाउंडेशनमधून तुमच्यासाठी कोट्यांमध्ये खर्च केला आहे.
तुमच्या मतांशिवाय मी ही निवडणूक जिंकू शकते त्यामुळे हे तुम्हाला भारी पडू शकते.
याप्रकरणी सुल्तानपूरच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी मेनका गांधी यांना नोटीस पाठवली आहे.
या वक्तव्यानंतर मनेका गांधी यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे.