केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोठा निर्णय

चीनमधून आलेल्या कोरोना विषाणूनने भारतातही थैमान घातलं आहे. या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण भारतात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. एप्रिल महिन्यातील १६ तारखेपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
काय आहे निर्णय ?
संपूर्ण देशभरात १४ एप्रिलपर्यंत टोलवसुली करणार नसल्याची मोठी घोषणा नितीन गडकरी यांनी केली आहे.
याबाबतची माहिती स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. या निर्णयामुळे आपत्कालीन सेवांच्या पुरवठ्यात येणारी गैरसोय कमी होईल. सोबतच वेळेची बचत देखील होईल, असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.
Lockdown : अंत्यविधीसारख्या प्रसंगी ‘इतक्याच’ व्यक्तींना परवानगी
टोलवसुलीला स्थिगिती दिला आहे. मात्र टोल प्लाझावर रस्त्यांची देखभाल आणि आपत्कालीन स्रोतांची उपलब्धता नेहमीप्रमाणे सुरू राहील, असंही नितीन गडकरी यांनी ट्विटकरुन सांगितलं आहे.