Thu. Apr 22nd, 2021

प्रत्येकानं लघवी साठवली, तर देशाचे 40 हजार कोटी वाचतील – नितीन गडकरी

आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीनं युरीन म्हणजेच लघवी साठवून त्यापासून युरिया तयार केला तर देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील, असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. नागपूर येथील सरपंच सम्राट या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. त्यांनी यावेळी अनेक गोष्टींवर भाष्य केलं. देशातील ग्रामीण भागांमध्ये योग्य त्या सुविधा पोहचत नाही, त्यामुळे लोक शहराकडे वळत आहेत. म्हणून शहरातील लोकसंख्या वाढून शहरातील समस्या वाढल्या आहेत, असे गडकरी म्हणाले.

 काय म्हणाले गडकरी?

प्रत्येक व्यक्तीनं लघवी साठवायला हवी.

त्यामुळे आपल्या देशाचे 40 हजार कोटी रुपये वाचतील.

देशातील ग्रामीण भागांमधील अपुऱ्या सुविधांमुळे लोक शहराकडे वळतात.

म्हणून शहरातील लोकसंख्या वाढून शहरातील समस्या वाढतच आहेत.

देशात साखर, डाळ, तांदूळ यांचं प्रमाण भरपूर आहे.

त्यामुळे शेतीमालाला भाव योग्य भाव मिळत नाही.

सरकार कुणाचंही असलं तरीही,परिस्थिती बदलतच नाही.

तसेच पूर्वी गावात 85% लोक राहायचे, पण आता 65% लोक राहतात.

गावात काम नाही, चांगलं शिक्षण नाही, म्हणून लोक गाव सोडत आहेत.

याशिवाय गावात डॉक्टर नाही, डॉक्टर असला तरी नर्स नाही आणि दोन्ही असले तरी औषध नाही.

मग मरायला कोण जाईल दवाखान्यात?

आपण यापूर्वी लघवी साठवण्याबद्दल बोललो. त्यावर लोक हसले. मात्र मी माझ्या वक्तव्यावर आजही ठाम आहे, असं गडकरी यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *