Wed. Jan 19th, 2022

विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागांवर निवडणूक बिनविरोध

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूकीत भाजप आणि महाविकास आघाडी सरकारचे सूत जुळले आहेत. विधान परिषदेच्या ६ पैकी ४ जागांवर निवडणूक बिनविरोध होणार आहे. तसेच उर्वरित २ जागांवर पक्षनेत्यांची चुरस पाहायला मिळणार आहे. ४ जागांवरील बिनविरोध निवडणुकीत दोन जागा भाजप पक्षाला मिळाल्या आहेत. तर काँग्रेस आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

मुंबईतील दोन जागा, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारच्या प्रत्येकी एका जागेवर बिनविरोध निवडणूक होणार आहे. मुंबईमध्ये भाजपचे राजहंस सिंह आणि शिवसेनेचे सुनील शिंदे बिनविरोध निवडणूक लढवणार आहेत. तर कोल्हापूरमदध्ये उमेदवार सतेज पाटील आणि धुळे-नंदुरबार येथे भाजपचे अमरिश पटेल बिनविरोध निवडणूक लढवणार आहेत.

विदर्भामध्ये भाजपला महाविकास आघाडीचे आव्हान आहे. नागपूरमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार डॉ. रविंद्र भोयर आहेत तर वाशिम बुलढाणा मतदारसंघात भाजपचे वसंत खंडेलवाल आणि शिवसेनेचे नेते गोपीकिशन बाजेरिया यांच्यात सामना रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *