Jaimaharashtra news

Bulandshahr Violence: पोलीस निरीक्षक सुबोधकुमार सिंग यांची हत्या?

उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरात घडलेल्या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस इन्स्पेक्टर सुबोधकुमार सिंग यांची हत्या गोळीबारात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सुबोध कुमार सिंह यांच्यासह एका तरुणाचा मृत्यू झाला.

ही हत्या एका निवृत्त पोलीस फौजीने गोळी झाडल्याने केल्याचे सांगण्यात येत आहे. जमावाच्या दगडफेकीत सुबोध सिंग यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते.

मात्र एका व्हिडिओत त्यांचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे दिसत असून, सोबत त्यांच्या हातावर आणि इतर ठिकाणी धारदार शस्त्राने वार केल्याच्या जखमा आहेत. दरम्यान या सर्व घटनेची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिले आहे. तसंच या सर्व घटनेनंतर उत्तरप्रदेश पोलिसांकडून सुबोधकुमार सिंग यांचा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला.

सुबोध कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक धक्का बसला आहे. त्यांच्या मुलाने वडिलांच्या निधनानंतर प्रतिक्रिया दिली आहे.

‘मी या देशाचा एक चांगला नागरिक व्हावं असे माझ्या वडिलांना वाटायचे. धर्माच्या नावाखाली सुरु असलेल्या हिंसाचाराविरोधात ते नेहमी मला हेच सांगायचे. दुर्दैवाने हिंदू- मुस्लीम वादात आज मी वडिलांना गमावले. आता उद्या आणखी किती पित्यांचा बळी घेणार?, असा संतप्त सवाल सुबोध कुमार सिंह यांच्या मुलाने विचारला आहे.

पोलीस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. यात मुख्य आरोपी योगेश राज याचाही समावेश आहे. योगेश राजने जमावाला चिथावणी दिल्याचा आरोप असून तो बजरंग दलाचा नेता आहे.

Exit mobile version