Wed. Apr 14th, 2021

कदाचित ‘How’s the Josh?’ हा डायलॉग सिनेमामध्येच नसता…

एखादा सिनेमा हा त्या सिनेमाच्या कथेसाठी तर लक्षात राहतोच पण त्या मधल्या एखाद्या डायलॉग लाईनमुळे तो अजरामर होतो. अशा सिनेमांची कितीतरी उदाहरणं सिनेसृष्टीमध्ये आहेत. अशाच ‘उरी’ या सिनेमाच्या ‘How’s the Josh?’ या डायलॉगने अख्खं थिएटर शहारून गेलं होतं. पण उरीमधल्या या डायलॉगसाठी खुद्द या सिनेमाचा अभिनेताच तयार नव्हता. त्याने सिनेमामध्ये हे वाक्य न घेण्यासाठी दिग्दर्शकाला तशी विनंतीही केली होती.

 

 

View this post on Instagram

 

It’s not just a line anymore… I get so many “How’s the Josh?!” videos from you all everyday, each one made with so much love and passion, from schools, colleges, cafes, work places… from people fighting the cold in minus temperatures to people sweating it out in the gym… from conference meetings to marriage ceremonies… from a 92 years old grandmother to a 2 years old kid… from even our Jawaans in the armed forces. It’s not just a line anymore, you all have turned it into an emotion… an emotion so strong and special, I’m going to cherish for life. Thank You everyone. इस प्यार और सम्मान के लिए तहे दिल से शुक्रिया। ❤️🙏

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

 

सिनेमामध्ये  कथेएवढेच डायलॉग्जही महत्वाचे 

सिनेमाची कथा जितकी प्रेक्षकांना भावते, तितकीच त्या सिनेमामधली एखादी डायलॉग लाईनही प्रेक्षकांना भावते.

अगदी जुन्या काळापासून पाहायला गेलं तर शोले मधला ‘ कितने आदमी थे?’ हा डायलॉगही फेमस झाला होता.

‘बाबू मोशाय, जिंदगी बडी होनी चाहीऐ, लंबी नहीं…’ सारखं राजेश खन्नाच्या तोंडी आलेलं ‘आनंद’ या सिनेमामधला डायलॉगही गाजला.

दीवार मधलं ‘मेरे पास मां है…’ या सिनेमांना पाहता अशासारख्या कॅची वर्ड्सची आजही तरूणांमध्ये क्रेझ पाहायला मिळते.

हे सिनेमे बघितले नसले तरी आजच्या पिढीमध्ये किंवा येणाऱ्या नवीन पिढ्यामध्ये अशाच डायलॉग्जमुळे हे सिनेमे अजरामर राहतील.

अशाच ‘उरी’ या सिनेमाचा ‘हाऊज द जोश?’ या डायलॉगने थेएटर दणाणून गेलं होतं.

याच वाक्यासाठी चक्क सिनेमाचा अभिनेता विकी कौशलच तयार नव्हता.

त्याने यासाठी दिग्दर्शक आदित्य धर याला हे वाक्य न घेण्याची विनंतीही केली होती.

कारण विकीली या वाक्यामध्ये हवा असलेला जोश वाटत नव्हता.

पण यासाठी आदित्यने आर्मीमध्ये अशा उत्साह निर्माण करणाऱ्या घोषणा गरजेच्या असतात,

असं सांगत या वाक्याला या सिनेमामध्ये जागा दिली आणि हे वाक्य अजरामर झालं.

 

View this post on Instagram

 

#Uri emerges as 10th highest grossing Hindi film ever! Thank You for all the love and congratulations Team! 😊

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

‘How’s the Josh?’ ची खरी कहाणी

या वाक्याला उरी या सिनेमाच्या दिग्दर्शक आदित्य धर च्या खऱ्या आयुष्यामध्ये फार महत्त्व आहे.

त्याने यावेळेस त्याचा एक किस्सा सांगितला, आदित्य लहान असताना तो नेहमी आर्मी क्लब मध्ये जायचा.

त्यावेळेस तिथे एक माजी ब्रिगेडीअर यायचे.ते लहान मुलांना नेहमी चॉकलेट आणत होते.

ते देण्यासाठी ‘हाऊज द जोश’ विचारत आणि ‘हाई सर’ चे उत्तर जो कुणी मोठ्या आवाजात देईल, त्याला ते चॉकलेट दिले जात.

याची आठवण आदित्यला अजूनही होती आणि म्हणून त्याने या वाक्याचा वापर या सिनेमामध्ये केला.

हेच वाक्य आज सिनेमामध्ये खास पसंतीला पडून कायमचं अजरामर होईल, अशी कल्पनाही आदित्यला त्यावेळेस आली नसेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *