उर्मिला मातोंडकरचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

आगामी लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा केली जात होती. तसेच उर्मिला मातोंडकरला कॉंग्रेसमधून उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा करण्यात आली होती. मात्र कॉंग्रेसने याबद्दल अधिकृत माहिती दिली नसल्यामुळे ही फक्त चर्चा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र आता उर्मिलाने कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे तिला उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
उर्मिला मातोंडकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश –
अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेश सोहळ्यात संजय निरुपम, मिलिंद देवरा उपस्थित होते.
उर्मिला मातोंडकरला कॉंग्रेसमधून उत्तर मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.