Fri. Dec 3rd, 2021

सरकार दडपशाही करण्याचा प्रयत्न करतय, उर्मिला मातोंडकर यांचा आरोप

देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असंच घडतंय, त्यामुळे सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असं मत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज नागपूर मध्ये व्यक्त केलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ED कडून चौकशी होत आहे. गेले चार तास झाले ED च्या कार्यालयात त्यांची चौकशी होत आहे. तसेच पी चिदंबरम यांना देखील अटक झाली असून त्यांची ही सीबीआयकडून चौकशी होत आहे. याच्या सर्वच पक्षातून प्रतिक्रीया उमटत आहेत. उर्मिला मातोंडकर यांनी देखील यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. अशा कारवायांवर आवाज उठवला पाहिजे असं मत उर्मिला यांनी व्यक्त केलं आहे.

राज ठाकरेंच्या चौकशीवर उर्मिलाची प्रतिक्रीया

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ED कडून होणारी चौकशी, आणि पी चिदंबरम यांना झालेली अटक. या सर्वच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. उर्मिला मातोडकर यांनीही यावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. अशा कारवायांवर आवाज उठवला पाहिजे असं मत उर्मिला यांनी व्यक्त केलं आहे.

देशात सर्वसामान्य आणि असामान्य व्यक्तीबाबत असंच घडतंय, त्यामुळे सर्वसामान्यांनी आवाज उठवायला हवा, असं मत काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी आज नागपूर मध्ये व्यक्त केलं आहे. पी चिदंबरम यांना देखील अटक झाली असून त्यांची ही सीबीआयकडून चौकशी होत आहे. याबद्दलही त्यांनी हेच मत व्यक्त केलं आहे. त्या नागपूर मध्ये बोलत होत्या.

स्वातंत्र्यानंतर कॉंग्रेसच्या कार्यकाळावर आताची सरकार सातत्याने टीका करतेय. त्या करिता युवा काँग्रेसतर्फे नाटकाचं अयोजन करण्यात आलंय यामध्ये स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासाकरिता काँग्रेसची भूमिका मंडण्यात येणार आहे. त्याकरिता उर्मिला मातोंडकर नागपुरात दाखल झाल्या आहेत. यावेळी त्या बोलत होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *