Mon. Dec 6th, 2021

अमेरिकेचा सूड, जगभरात पडसाद

अमेरिकेने (USA) इराकमधील बगदाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला (Air attack) केल्याचा दावा इराकी मिलिशियाने केला आहे. या हवाई हल्ल्यात इराणच्या इलाईट क्वाड्स फोर्सचा कमांडर जनरल कासीम सोलेमानी (Kasim Sueleymani) आणि मिलिशिया कमांडर अबू महदी अल मुहांडिस ठार झाले.

सोलेमनी आणि अबू महदी सोबत 8 जणांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात आलं आहे. या हल्ल्याला आणि मृत्यूंना अमेरिका आणि इस्राइल जबाबदार असल्याचं इराक मिलिशियाचे प्रवक्ते अहमद अल-असदीने म्हटलं आहे.

अमेरिकेने इराकमध्ये इराणचा पाठिंबा असलेल्या आणि हिंसक कारवाया करणाऱ्या ठिकाणांवर हल्ले केले आहेत.

इराकची राजधानी बगदाद (Baghdad) येथे असलेल्या अमेरिकेच्या दूतावासावर संतप्त आंदोलकांनी हल्ला केला.

अमेरिकी दूतावासाच्या बाहेरील एका सुरक्षा चौकीलादेखील या आंदोलकांनी आग लावली.

हल्ल्यामागे इराणच- ट्रम्प

इराकमध्ये झालेल्या हल्ल्याला अमेरिका जबाबदार असल्याचं जरी म्हटलं जात असलं, तरी अमेरिकेने ही गोष्ट नाकारली आहे.

हवाई हल्ल्यामागे इराण असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी म्हटलंय.

एवढंच नव्हे, तर इराणने इराकवर केलेल्या या हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी धमकीही त्यांनी Twitter वरून दिली आहे.

बगदादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील हल्ल्याचे पडसाद आखाती देशांत उमटले आहेत.

आखाती भागात तणावाचं वातावरण आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे भाव वाढले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *