Sat. Feb 27th, 2021

भारतीय नागरिकांच्या नादमय प्रतिसादाचं अमेरिकेकडून कौतुक

Thane: People clap and clang utensils as a gesture to show gratitude to the helpers and medical practitioners who are working relentlessly to fight coronavirus during Janta curfew, in Thane, Sunday, March 22, 2020. PM Modi proposed a 'Janta curfew' between 7 am and 9 pm as part of social distancing to check the spread of the deadly virus. The number of coronavirus cases across the country rose to above 320 on Sunday. (PTI Photo)(PTI22-03-2020_000267B)

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी जनता कर्फ्यूचं आवाहन केलं होतं. त्याला जनतेने सकारात्मक प्रतिसाद दिला. तसंच संध्याकाळी ५ वाजता टाळ्या किंवा थाळ्या वाजवून अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार म्हणून टाळ्या आणि थाळ्या वाजवण्याचंही आवाहन मोदींनी केलं होतं. या आवाहनाला जनतेने दिलेला नादमय प्रतिसाद पाहून अमेरिकाही भारावून गेली.

२२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत जनता कर्फ्यू राखण्यात आला. यावेळी संध्याकाळी ५ वाजता अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या सेवाकर्मींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी टाळ्या, थाळ्या वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. यावेळी देशभरातील नागरिकांनी वादन करत या आवाहनाला प्रतिसाद दिला. मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही बाल्कनी, टेरेसमधून थाळ्या वाजवत, घंटनाद करत प्रतिसाद दिला. भारतीयांच्या या प्रतिसादाचं अमेरिकेकडून कौतुक केलं. भारतीय जनतेचा प्रतिसाद प्रेरणादायी असल्याचं अमेरिकेने म्हटलं आहे.

दक्षिण मध्य अशियाचे सहाय्यक सचिव एलिस जी वेल्स यांनी ट्विट करून COVID-19 शी लढणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय नागरिक ज्या पद्धतीने एकत्र आले, ते निश्चितच कौतुकास्पद आहे.  हा व्हिडिओ PIB ने पोस्ट केला आहे. यामध्ये भारतीय नागरिक टाळ्या वाजवताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *