Wed. Jan 19th, 2022

ठाण्यातील निवासीसंकुलात ११०० जणांचं लसीकरण

लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेचा फज्जा उडाला असतानाच ठाणे महापालिका आयुक्त यांनी गृहसंकुलांना सर्व आवश्यक सुखसोयी उपलब्ध करून खाजगी रुग्णालयाच्या माध्यमातून लसीकरणाची परवानगी दिली. हिरानंदानी मेडोज सोसायटीने शुक्रवारी तब्बल ११०० लोकांचे लसीकरण केले. ठाण्यातील हि पहिली सोसायटी ठरली आहे. स्वखर्चाने केले ११०० लोकांचे लसीकरण.

ठाणे महानगर पालिकेच्या आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या घेऊन नवी मुंबईच्या अपोलो रुग्णालयाशी टायअप करून हिरानंदानी मेडोज या गृहसंकुलाच्या सोसायटीने इमारतीत राहणाऱ्या सोसायटीच्या सदस्यां सोबतच घरकाम करणाऱ्या महिला, सुरक्षा रक्षक, वाहनचालक अशा ११०० लोकांचे लसीकरण स्वखर्चाने करून घेतले. कोरोनापासून सुरक्षित राहण्याचे एकमेव पर्याय हा लसीकरणाचा ठरल्याने जास्तीत जास्त ठाणेकरांचे लसीकरण होणे गरजेचे असल्याने पालिका आयुक्तांनी गृहसंकुलाच्या सोसायटीना परवानगी दिली. हिरानंदानी मेडोज सोसायटीने अपोलो रुग्णालयाच्या डॉक्टर टीमने यशस्वीरीत्या लसीकरण केले. हिरानंदानी मेडोजच्या या लसीकरणाला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

कोरोनाच्या प्रभावाला रोखण्यासाठी लसीकरण हे महत्वाचे असल्याने पालिकेच्या किंवा सरकारी लसीकरणाची मोहीम संथ गतीने सुरु आहे. मात्र जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण महत्वाचे असल्याने पालिकेच्या परवानगीने हे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार सोसायटीच्या सदस्यांनी व्यक्त केले आहेत. देशभरात कोरोना लसीकरण मोहिम जोरदार सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *