Fri. Aug 12th, 2022

वैष्णवी मोरेचा रिंग डान्स सोशल मीडियावर वायरल

जगभरात वेगवेगळगे टॅलेंट पहिलेच आहे आपण . जगभरात टॅलेंटची कमी नाही आहे . सोशल मीडियावरील पोस्ट व्हिडिओमध्ये याचा प्रत्यय येत असतो. वैष्णवी मोरे या डान्सर मुलीने अशीच जबरदस्त कमल केली आहे . वैष्णवीने केसरी रंगाची साडी नेसली आहे . तसेच तिने ‘हुला हूप’ म्हणजेच ‘रिंग डान्स’ केली असून त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर जोरदार व्हायरल होते आहे . त्यातील तिच्या हटके अंदाजातील हुल हूपा आणि बेली डान्सचे कॉम्बिनेशन बघून तिचे चाहते थक्क झाले आहेत .

वैष्णवी मोरे हिचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोअर्स आहेत.डान्सिंग डॉल अशी तिची ओळख आहे. वैष्णवी बऱ्याचदा तिचे रिंग डान्स चे व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते .आताही तिने माधुरी दीक्षितच्या ‘बडी मुश्किल है’ या गाण्यावर साडी नेसून अफलातून डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे .तसेच कमरेवर रिंग ठेऊन आणि ती रिंग अत्यंत कौशल्याने गाण्याच्या ठेक्यानुसार फिरवून कधी डोक्यावर नेते तर कधी हातात घेते. गाण्याच्या सुरांवर वैष्णवीच्या लाजवाब नृत्य पाहण्यास आहे . आतापर्यंत ३० लाखांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ बघून तिचे भरभरून कौतुक केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.