Jaimaharashtra news

Valentine’s Day : दिवस प्रेम व्यक्त करण्याचा…

14 फेब्रुवारी  “Valentine’s  Day” हा प्रेमाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतात जरी या दिवसाचं लोण काही वर्षांपासून पसरायला लागलं असलं, तरी या दिवसाला मध्ययुगीन इतिहास आहे.

इतिहास-

संसारी माणूस चांगला सैनिक होऊ शकत नाही, या विचारातून रोमन राजा क्लॉडियस याने लग्नसंस्थेच्या विरोध केला होता.

मात्र सेंट व्हेलेंटिन यांनी प्रेमी तरुणांना एकत्र आणून त्यांचं लग्न लावून दिलं. यामुळे चिडून क्लॉडियसने सेंट व्हॅलेंटिनला शिक्षा दिली होती.

सेंट व्हॅलेंटाइनला 14  फेब्रुवारी रोजी श्रद्धांजली अर्पण केली जाते.

 

14 फेब्रुवारीच का?

टॉसर नावाच्या कवीने 1375 साली The Parliament of Fowls ही कविता लिहिली होती.

या कवितेत 14 फेब्रुवारी या दिवसाचं महत्त्व त्याने विषद केलं होतं.

पशू पक्षी, माणसं या सर्वांच्या मिलनाचा काळ 14 फेब्रुवारीपासून सुरू होतो, असं त्याने या कवितेत म्हटलंय.

त्यामुळे या दिवसाला प्रेमाचा दिवस मानला जातोय.

 हे देवाघरचे देणे…

प्रेम ही एक अत्यंत सुंदर, सालस, गोड, मनमोहक अशी  भावना आहे.

या जगात असे कुणीच नाही,जे कधी प्रेमात पडले नाही.

अगदी थोरा-मोठ्यांपासून ते लहानांपर्यंत सर्वच प्रेम अनुभवतात.

प्रेम हे देवाने दिलेलं एक वरदान आहे.

एक अनोळखी व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपलं सर्वस्व बनून जाते आणि पाहता- पाहता त्या व्यक्तीशिवाय जगणेच कठीण होते.

प्रेम म्हणजे एक रेशीम धागा, जो दोन जीवांना एका सुंदर नात्यात बांधून ठेवतो.

पण हो, हा नाजूक धागा जर दोन्हीं बाजूंनी जास्त ओढला गेला, तर नात्याला धोका असतो.

यासाठी मित्रांनो, आपले प्रेमाचे नाते नजाकतीने सांभाळा.

आपल्या प्रेमावर विश्वास ठेवून नाते सुंदर बनवून ते फुलाच्या सुगंधाप्रमाणे दरवळू द्या.

 

हलकी-हलकी सी

उनकी नजरें

मिलने लगी थीं……

चोरी-चोरी, चुपके-चुपके

इशारों में बातें होने लगी थीं……

दिल से एक आवाज आ रही थीं ;

वो पगला-सा,

वो पगली-सी,

जानते थें, समझते थें,

पर एक – दूजे से

बयान कैसे करें

समझ ही नहीं पाए….

तभी आ गया फरवरी,

और मिल गया दोनों को बहाना,

अपने प्यार का इजहार करने का….

कर  दिया दोनों ने एक – दूजे से इजहार

मिल गए दो दिल

शुरू हो गयी उनकी प्रेमकहानी……

उस दिन को हम मनाएँगे, प्रेमदिन !!!!

 

 

Exit mobile version