Fri. Oct 2nd, 2020

वसई विरार महापौर मॅरेथॉन, मोहित राठोड प्रथम

वसई : वसई विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेत मोहित राठोड विजयी ठरला आहे. मोहित राठोडने 42 किलोमीटरच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. तर धर्मेंद सिंग दुसरा क्रमांक पटकावला आहे. वसई-विरार महापौर मॅरेथॉन स्पर्धेचे यंदाचे नववे पर्व होते.

स्पर्धेच्या विविध गटांमध्ये धावणाऱ्या हजारो धावपटूंना प्रोत्साहीत करण्यासाठी आशियाई मॅरेथॉन चॅम्पियन गोपी टी उपस्थित होता. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनीदेखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती

या स्पर्धेत 18 ते 20 हजाराहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. ‘स्वच्छ वसई हरित वसई’ , ‘बेटी बचाव बेटी पढावट या ब्रीद वाक्याने स्पर्धेची सुरवात करण्यात आली. मॅरेथॉन स्पर्धेत राज्यासह गुजरात,नवी दिल्ली,मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश या राज्यातून असंख्य धावपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *