मोकाट जनावरांचा उच्छाद,वाहनांचं नुकसान, प्रशासनाचं दुर्लक्ष

राज्यात ठिकठिकाणी मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. यामुळे तेथील रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा रहिवाशांनी तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र पहायला मिळते. दरम्यान येवल्यामध्ये अशाच मोकाट जनावरांचा रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.
येवला शहर आणि परिसरातील वाढत्या मोकाट जनावरांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहराच्या भाजी बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते.
याच भाजी बाजारात दोन मोकाट जनावरांची तुफान मारामारी झाल्याने परिसरात उभ्या असलेल्या वाहनांवर या जनावरांची झुंज गेली. यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर नागरिक या जनावरांची झुंज पाहून पळू लागले.
तरी या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. याकडे प्रशासन मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहे का? असा सूरदेखील नागरिकांमधून येत आहे.