Thu. Nov 26th, 2020

म्हणून जुना वर्सोवा पुल 4 दिवसांसाठी बंद राहणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धीम्या कामकाजापायी 8 महिन्यांपासून रखडलेला जुना वर्सोवा पुल ‘लोड टेस्टिंग’साठी 14 ते 17 मे दरम्यान सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे.

त्यामुळे येथील नव्या पुलावरून होणारी अवजड वाहतूक इतरत्र वळवली जाणार आहे. या दुरूस्तीच्या कामामुळे ऐन सुट्ट्यांमध्ये शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांची कोंडी होण्याची शक्यता आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जुन्या वर्सोवा पुलाची तपासणी केली असता त्याच्या सिमेंट काँक्रीटच्या एका गर्डरला भेगा पडल्याचे आढळून आले. त्यामुळे गेल्यावर्षी 15 सप्टेंबरपासून या पुलावरील अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद करून केवळ हलक्या वाहनांसाठीच पूल खुला ठेवण्यात आला होता. या काळात नव्या पुलावरून केवळ हलक्या वाहनांची वाहतूक सुरु राहणार असून मालवाहू गाड्यांना भिवंडीमार्गे पाठवले जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *