ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे निधन

ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांचे आज निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात वयाच्या ७०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कीर्ती शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीवर शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून कीर्ती शिलेदार यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचादारम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
संगीत क्षेत्रात ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांनी मोलाची कामगिरी केली आहे. पिढ्यान् पिढ्या घराण्याचा संगीताचा वारसा कीर्ती शिलेदार यांनी जोपासला. नाट्यसंगीताचा वारसा कीर्ती शिलेदारांनी संगीत क्षेत्रात वाढवला आहे. त्यांनी जीवनप्रवासात अभिनय आणि गायनाने स्वत:चा ठसा उमटवला आहे. तसेच २०१८साली पार पडलेल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे कीर्ती शिलेदार यांनी अध्यक्षपद भूषविले होते.