Wed. Jul 8th, 2020

विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात…

जय महाराष्ट्र वेब न्यूज, पूणे 

पिंपरी- चिंचवडमध्ये विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या अपघातात 3 विद्यार्थी जखमी झाले असून रिक्षेने पुणे मेट्रोच्या कामासाठी लावलेल्या बॅरिगेट्सला धडक दिल्याने हा अपघात झाला. सतर्क नागरिकांनी रिक्षेतून वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात झाला. चालकाचे रिक्षेवरील नियंत्रण सुटले आणि हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. मेट्रोचे काम सुरु असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. मेट्रोच्या कामासाठी ठिकठिकाणी बॅरिगेट्स लावले आहेत. अरुंद रस्त्यावर चालक रिक्षा वेगाने चालवत होता. अपघाताच्या वेळी पाच विद्यार्थी रिक्षेत होते. यातील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. सर्व विद्यार्थी हे खडकीतील सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *