Video : पाणीपुरी आवडते मग ही बातमी पाहाच…

तुम्ही जर का नागपूर मध्ये पाणीपुरी खाणार असाल तर आधी पाणीपुरीचं पाणी स्वछ आहे नाही ते एकदा नीट बघून घ्या. कारण नागपूर मध्ये रस्त्यावर साचलेल्या पावसाच्या पाण्याचा वापर पाणीपुरी मध्ये केला जात असल्याचा एक खळबळजनक व्हिडिओ पुढे आला आहे.
नागपूर मध्ये रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा वापर पाणीपुरी मध्ये केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. गुरुदेवनगर चौक येथे मथुरावासी पाणीपुरीवाल्याने हे कृत्य केलं असून एका सुज्ञ नागरिकाने याचं चित्रीकरण करून हा प्रकार उघडकीस आणला आहे. त्यामुळे नागपूरचं अन्न प्रशासन विभाग काय करत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. सोबतच या पाणीपुरी दुकान चालकावर कारवाई ची मागणी पुढे आली आहे.
गुरुदेवनगर चौक येथे ‘मथुरावासी पाणीपुरी’ नावाने प्रसिद्ध दुकान आहे.
दुपारी याच्या मालकाने पाणीपुरीसाठी लागणारं पाणी दुकान समोर असलेल्या रस्त्यावरील डबक्यातून घेतलं.
हा सर्व प्रकार भरदिवसा घडला. विकास मार्कांडे या सुज्ञ नागरिकाने याचं चित्रीकरण केले.
हा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.
या घटने नंतर रस्त्यावरचे निष्काळजीपूर्वक अन्न खाणे किती धोकादायक असते हे परत एकदा सिद्ध झाले आहे … जीवन आवश्यक वस्तूं संदर्भात कठोर असतांना दुकानदारांमध्ये त्या बद्दल भीत नाही व सोबत अन्न व प्रशासन विभाग यांचे देखील अशा दुकानावर लक्ष नाही हे पाहायला मिळते