Tue. Mar 31st, 2020

विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर पावसाचे सावट

राज्यात एक दिवसावर विधानसभा निवडणुक येवून ठेपली आहे. परंतु विधानसभा निवडणूकीच्या मतदानावर पावसाचे सावट राहण्याची शक्यता आहे

राज्यात विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मात्र मतदानावर पावसाचे सावट असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परतीच्या पावसाने रविवारपासून पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात तर पुणे, नाशिक, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात पाउस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात पावसाचं सावट –

सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसाचा जोर बुधवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

देशासह राज्यातून मागील अठवड्यात पावसाने परतीचा प्रवास पूर्ण केला.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्याच्या सर्वच भागात मुसळधार पाउस ते आतिवृष्टी या प्रमाणात पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे राज्यातील बहुतांश धरणांत 90 ते 100 टक्के पाणीसाठा झाला.

पावसाने परतीचा प्रवास पूर्ण केल्यामुळे पाऊस थांबला आहे, असे वाटलेले असतानाच शुक्रवारी रात्रीपासून राज्याच्या काही भागात परत पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केली.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

राज्यातील मध्य-पूर्व अरबी समुद्रापासून ते कर्नाटक, केरळच्या किनारपट्टीपर्यंत पुढील तीन दिवस ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत.

या वाऱ्याचा वेग सरारीपेक्षा जास्त असल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *