Thu. Oct 1st, 2020

मुंबईतील ‘या’ विधानसभा जागांवर आजी- माजी नगरसेवकांना उमेदवारी

मुंबईतील विधानसभा जागांवर यंदा आजी माजी नगर सेवकांची लॉटरी लागली आहे.

मुंबईतील विधानसभा जागांवर यंदा आजी माजी नगर सेवकांची लॉटरी लागली आहे. आमदार होण्यासाठी इच्छुक शिवसेना, भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि मनसेच्या वतीने विद्यमान 10 नगरसेवकांनीही आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर 4 माजी नगरसेविकांना ही तिकीट मिळालं आहे.
आतापर्यंत नगरसेवक पदाची धुरा सांभाळलेल्या नगरसेवकांना यंदा आमदारकीची लॉटरी लागली आहे. आतापर्यंत नगरसेवक असल्याने स्थानिक पातळीवरील समस्या चांगल्याच माहीत असतात आणी म्हणून थेट पालिकेतून विधानसभेच्या रिंगणात अनेक नगरसेवकांना लढत आहेत. त्यामुळे यंदा नगरसेवकंची चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

निवडणूक रिंगणात उतरलेले नगरसेवक

विश्वनाथ महाडेश्वर, महापौर मुंबई (वांद्रे पूर्व)

रमेश कोरगावकर, माजी अध्यक्ष, स्थायी समिती (भांडुप)

रईस शेख, गटनेता, समाजवादी पक्ष (भिवंडी)

पराग शहा,नगरसेवक, भाजप (घाटकोपर पूर्व)

गिता गवळी, सदस्य, स्थायी समिती (भायखळा)

आसिफ झकेरिया, सदस्य, स्थायी समिती,काँग्रेस (वांद्रे पश्चिम)

संजय तुर्डे, नगरसेवक, मनसे (कलिना)

दिलीप लांडे, नगरसेवक, शिवसेना (चांदिवली)

जगदिश अमिन कुट्टी (अंधेरी पूर्व)

राजुल पटेल- सदस्य, स्थायी समिती, शिवसेना(वर्सोवा-अपक्ष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *