Sat. Jun 6th, 2020

पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, कराडमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणुक प्रचार शुभारंभातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर गटाला तिसरा जोरदार धक्का दिला आहे.

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार अतुल भोसले यांनी निवडणुक प्रचार शुभारंभातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका उंडाळकर गटाला तिसरा जोरदार धक्का दिला आहे. चव्हाण, उंडाळकर गटाच्या माजी पंचायत समिती सभापती, सरपंच, सोसायटी चेअरमन अशा शंभरच्या वर पदाधिकाऱ्यांचा अतुल भोसले यांच्या प्रचार शुभारंभ सभेत भाजपात प्रवेश झाला तर बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उमेदवार पंजाबराव पाटील यांनी भाजपाचे उमेदवार डॉ. अतुल भोसले यांना पाठींबा देत निवडणुकीतून माघार घेतली आहे

सातारा लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार अतुल भोसले यांच्या प्रचाराचा शुभारंभ कराड तालुक्यातील विंग येथे झाला. यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी आपला पाठिंबा अतुल भोसले यांना दिला.

कराड दक्षिण मधल्या शंभरच्या वर काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक माजी सरपंच, सरपंच माजी सोसायटी चेअरमन पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला. या अगोदर पृथ्वीराज चव्हाणांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील,कराड पालिकेचे चौदा नगरसेवक यांचा भाजपात प्रवेश झाला आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे.

यावेळी अतुल भोसले यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण केले. त्यांनी विरोधी उमेदवार श्रीनिवास पाटील पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. श्रीनिवास पाटील यांनी फक्त पदं भुषवल्याचा आरोप केला. फक्त पद भुषवणे हा विकास नसतो. उदयनराजेंनी आघाडी सरकारच्या काळात पैसा खर्च झाला पण विकास झाला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *