महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात, सुरक्षा व्यवस्था तैनात

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रीयेला सुरूवात झाली आहे. राज्य विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान पार पडत आहे. यासाठी सर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. महा 96 हजार 661 मतदान केंद्र असून यातील 2747 संवेदनशील मतदान केंद्र आहेत. निवडणुकीत तीन हजार 237 उमेदवार रिंगणात आहेत. तीस लाखाहून जास्त फौजफाटा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आला आहे.