विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर विद्या चव्हाण यांच्या सुनेची प्रतिक्रिया

राष्ट्रवादीच्या नेत्या आणि आमदार विद्या चव्हाण यांनी मंगळवारी गौप्यस्फोट केला. आपल्या सुनेचे विवाहबाह्य संबंध असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या.
यासर्व प्रकारानंतर त्यांना भाजपकडूनही सवाल उपस्थित करण्यात आले.
दरम्यान या सर्व प्रकरणावरुन विद्या चव्हाण यांच्या सुन डॉ. गौरी चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाल्या गौरी चव्हाण ?
विद्या चव्हाणांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत. विद्या चव्हाण यांचे खायचे दात आणि आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असं डॉ गौरी चव्हाण म्हणाल्या.
माझ्या दिराने मानसिक छळ केल्याचा आरोप गौरी चव्हाण यांनी केला.
तसेच मानसिक आणि शारिरीक छळ केला असल्याचं गौरी चव्हाण म्हणाल्या. मला न्याय हवाय. न्यायासाठी मी लढा देणार, असं गौरी चव्हाण म्हणाल्या.
मी पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळेस कुटुंबियांनी माझ्याविरोधात पुरावे गोळा करुन बदनामी करणार, अशी धमकी दिली होती.
त्यांना तेच केलं आणि माझ्याविरोधात कट रचल्याचं गौरी चव्हाण म्हणाल्या.
विद्या चव्हाण काय म्हणाल्या होत्या ?
मी 30 वर्षांपासून गोरगरबांसाठी, महिलांसाठी लढतेय. माझा मुलगा इंजिनियर आहे.
कंपनीतर्फे माझ्या मुलाला त्याच्या पत्नी आणि 5 वर्षाच्या मुलीबरोबर डेन्मार्कला पाठवत होती.
सुनेचे विवाहबाह्य संबंध, विद्या चव्हाण यांचा गौप्यस्फोट
त्या दरम्यान त्याची पत्नी, माझी सून गौरीच्या मोबाईल मधून काही धक्कादायक माहिती पुढे आली असल्याचं विद्या चव्हाण म्हणाल्या.
दरम्यान विद्या चव्हाण यांच्या सुनेने त्यांच्या चव्हाण यांच्या कुटुंबियांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विलेपार्ले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.