भिकेचं कटोरं घेऊन भाजप ‘मातोश्री’वर- विखे पाटील

भाजप शिवसेना युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर विरोधकांनी टिकेची झोड उठवलीय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेना आणि भाजपावर टीका करताना ठाकरेंनी कोणती मांडवली केली, असा सवाल उपस्थित केला.
‘भाजपाने स्वाभिमान गहाण ठेवला. भिकेचं कटोरं घेऊन मातोश्रीवर गेले. सत्तेसाठी भाजपाने लाचारी पत्करलीय, संधीसाधू लोकांची ही अभद्र युती आहे’, असं विखे पाटील म्हणाले.
काँग्रेसकडून अजून उमेदवार नाहीत
काँग्रेसकडून कोणाचीही उमेदवारी जाहीर नाही, असं स्पष्टीकरण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं.
सुशीलकुमार शिंदे, अमिता चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या वृत्ताचं त्यांनी खंडन केलं.
काँग्रेसकडून अजून कोणाचीही उमेदवारी जाहीर नाही.
केंद्रीय निवड समितीच लोकसभेचे उमेद्वारांची नावे ठरवेल.
नगर दक्षिणेच्या जागेवरून आजही आघाडीत ओढाताण सुरू आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील या जागेसाठी इच्छूक आहेत.
या जागेसंदर्भात बोलताना अहमदनगरची जागा कोणीही प्रतीष्ठेची करू नये, तर आघाडीच्या अधिक जागा कशा निवडून येतील याचा विचार व्हायला हवा.
असं म्हणत विखे पाटलांनी अप्रत्यक्ष शरद पवारांना आवाहन केलं आहे.