Sun. Oct 17th, 2021

…म्हणून विखे- पाटील महाजनांना भेटले 

काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि आशिष देशमुख यांनी आज शिवनेरी बंगल्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली या भेटीनंतर अनेक चर्चांना राजकिय वर्तुळात उधाण आले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखें पाटील यांने भाजपात प्रवेश केला आणि हा पेच निर्माण झाला आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसवर नाराज असल्याने या भेटीवर अनेक चर्चा होत आहे. परंतु मी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील तिढा सुटावा यासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.

म्हणून विखे- पाटील महाजनांना भेटले

मी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेतील तिढा सुटावा यासाठी गिरीश महाजन यांची भेट घेतली.

याचबरोबर नगर मधील पाणी प्रश्नावर आणि कालव्याच्या काम संदर्भात आज महाजन यांच्याशी चर्चा केली.

या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. असं ही ते म्हणाले

माझ्या भाजप प्रवेशाची उत्सुकता माझ्यापेक्षा प्रसार माध्यमानाचं अधिक आहे.

मी माझा राजीनामा काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे दिला आहे.बाकी निर्णय काँग्रेस श्रेष्ठी घेतील.

30 नोव्हेंबर 2018 रोजी महाराष्ट्रात मराठा आरक्षण लागू करण्यात आलं.

मात्र नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार या आरक्षणाचा लाभ मेडिकल विभागातील कोणत्याच विद्यार्थ्याला घेता येणार नाही.

यामुळे पेच निर्माण झाला असून विद्यार्थ्याचे नुकसान होणार असल्याने या विषयाची चर्चा केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *