Mon. Sep 28th, 2020

देश खड्ड्यात घालायला काय मनसे पक्ष आहे का ? -विनोद तावडे

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष प्रचार करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राजकीय नेते प्रचार करण्यासाठी प्रचारसभा घेत असून विरोधकांवर घणाघाती टीकाही करत आहेत. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील सभेत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. यंदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदींना निवडून आणू नका. तसेच राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवा असेही राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले विनोद तावडे ?

राज ठाकरे यांनी शनिवारी झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली होती.

यंदा राहुल गांधींना पंतप्रधान बनवा असेही त्यांनी यावेळी म्हटलं.

मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केल्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

पंतप्रधान मोदींचे पाय धुवून पाणी प्या असे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना राज ठाकरे म्हणाले होते.

मात्र तेच आता पंतप्रधानांवर टीका करत राहुल गांधींना पंतप्रधान बनवा असे म्हणत आहेत.

देश खड्ड्यात तरी जाईल किंवा चालेल तरी असे राज ठाकरे म्हणाले आहे.

तर देश खड्ड्यात घालायला काय मनसे पक्ष आहे का ? असा टोलाही विनोद तावडे यांनी लगावला आहे.

ज्या पक्षाने राज ठाकरे यांच्यावर प्रचंड टीका केली होती त्यांनाच मतदान करण्यास सांगत असल्याचे ते म्हणाले.

मनसे कार्यकर्ते तरी कॉंग्रेस- राष्ट्रवादीला मतदान करतील का असाही प्रश्न विनोद तावडे यांनी उपस्थित केला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *