Fri. Aug 14th, 2020

Video :पेंचमधील ‘त्या’ अद्भूत दृश्याचा व्हिडिओ व्हायरल

A Malayan tiger named "Kathy" is seen at the National Zoo in Kuala Lumpur December 17, 2009. Malaysian government launched a "Tiger Action Plan" to protect against wild tigers in the region, where the species was reported a drastic drop in population from at least 3,000 to around 500 over past 50 years. The initiative of the plan was to increase the amount of wild tiger to 1,000 by 2020. REUTERS/Bazuki Muhammad (MALAYSIA - Tags: ANIMALS ENVIRONMENT SOCIETY)

साधारणतः वाघ (Tigers) हे एकटे शिकार करतात. मात्र, नागपूर जवळच्या पेंच राष्ट्रीय उद्यानात वाघांच्या स्वभावाचा वेगळा पैलू समोर आणणारी घटना घडली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर विस्तार असलेल्या पेंच राष्ट्रीय उद्यानातील (Pench National Park) तुरिया गेट जवळच्या परिसरात 29 डिसेंबर रोजी सकाळी अनेक वाघांनी मिळून एका हरणाची शिकार केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉ मुकेश दिपानी या पर्यटकाने त्यांच्या मोबाईलमध्ये चित्रित केली आहे.

31 डिसेंबर रोजी सकाळी वाघाने केलेल्या शिकारीचे काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाले होते. त्यामध्ये ‘लंगडी’ या वाघिणीचे सुमारे 2 वर्षं वयोगटाचे दोन बछडे एका हरणाची शिकार करताना दिसत होते. डॉ दिपानी यांनी चित्रित केलेल्या व्हिडिओमध्ये या घटनेचा वेगळाच पैलू समोर आला आहे.

लंगडी वाघीण आणि तिचे चार बछडे जंगलाच्या (Jungle) एका भागातून दुसऱ्या भागाकडे जात असताना अचानक हरणाचा एक कळप समोर आला.

काही हरणांनी त्यांच्या सवयीप्रमाणे एकमेकांना सावध करण्यासाठी आवाज करायला सुरवात केली.

तेव्हाच लंगडी वाघिणीच्या चारही बछड्यांनी कळपातील एका मोठ्या हरणाचा पाठलाग सुरु केला.

हरीण चकवतोय हे पाहून तीन वाघ नियोजनबद्द पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी गवतात लपले.

तर एक वाघ हरणाचा पिच्छा करू लागला. अखेरीस चौघांपैकी दोन वाघांनी मिळून त्या हरणाला पकडलं आणि उरलेले दोन वाघही त्या ठिकाणी पोहोचले.

त्यामुळे पहिल्यांदाच वाघ समूहाने एक शिकार करत असल्याची दुर्मीळ घटना कैमऱ्यात कैद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *