Tue. May 11th, 2021

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कोटींची लुट, महामार्गावरील सुरक्षा धोक्यात

जय महाराष्ट्र न्यूज, विरार

 

विरारजवळील मुंबई-अहमदाबाद मार्गावरील काशीद-कोपर येथे ट्रक चालकास मारहाण करुण ट्रकमधील तब्बल 1 कोटी रुपयांचं कॉपर लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

पहाटे अडीचच्या सुमारास हिंदुस्थान कॉपर लिमिटेड कंपनीचा ट्रक कॉपर वायर घेवून जयपूरच्या दिशेने निघाला होता. यावेळी या ट्रकसमोर जीप आडवी घालून तिघांनी ट्रक चालकाला खाली उतरवले. आणि त्याला मारहाण करत रस्त्याच्या कडेला बांधून ठेवले.

 

दरम्यान, ट्रक घेऊन फरार झालेल्या दरोडेखोरांनी काही अंतरावर ट्रेलरमधील माल दुसऱ्या गाडीत भरला, आणि ते पसार झाले. या ट्रेलरमध्ये 1 कोटी 17 लाख किमतीचे 26 टन 316 किलो कॉपर वायरचे बंडल होते. या प्रकारामुळे महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *