विराट कामगिरी! क्रिकेट करिअरमध्ये विराटने गाठला 20,000 रन्सचा टप्पा!

मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड ग्राउंडवर भारतीय कर्णधार विराट कोहली याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 20,000 रन्स पूर्ण केल्या आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज संघात गुरुवारी रंगलेल्या सामन्यात विराटच्या नावावर विक्रम नोंदवला गेलाय. 20,000 धावांचा टप्पा गाठणारा विराट हा चौथा क्रिकेटपटू आहे. तसंच हा पडाव पार करणारा दुसरा भारतीय क्रिकेटपटू आहे.
‘विराट’ कामगिरी!
सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा, रिकी पॉन्टिंग नंतर आता विराट कोहलीने या यादीत पराक्रम गाजवला आहे.
विशेष म्हणजे विराटने सर्वांत जलदगतीने 20 हजार रन पूर्ण केल्या आहेत.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन आणि वेस्टइंडिजचा आक्रमक बॅट्समन ब्रायन लारा यांनी आपल्या कारकीर्दीत 20 हजार रन्स पूर्ण केल्या होत्या.
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने 464 सामन्यांत 20 हजार रन्स पूर्ण केल्या होत्या.