Wed. Dec 8th, 2021

विराट कोहली ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता,सोशल मीडियावर जुने फोटो होताय व्हायरल…

मुंबई: भारतीय क्रिकेट कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का हे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. विराट आणि अनुष्काची जोडी दमदार आहेचं शिवाय विराट आणि अनुष्काचे चाहते फक्त देशातच नाही तर जगभरात आहेत.विराटच्या चाहत्यांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. लग्नापूर्वी विराटच्या लव्ह लाइफची बरीच चर्चा होत होती. विराटनं २०१७ मध्ये अनुष्का शर्माशी लग्न केलं आणि या दोघांना आता एक मुलगी देखील आहे. सध्याला विराटची एक्स गर्लफ्रेंड इजाबेल लिटेचा सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोत विराटसोबत त्यांची एक्स गर्लफ्रेंड दिसून येत आहे शिवाय दोघेही यात आनंदी दिसत आहे. हा फोटो व्हायरल झाल्यामुळे विराट पुन्हा एकादा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो २०१२ ते २०१४ या काळातला असल्याचं म्हटलं जात आहे. विराटचे चाहते या फोटोवर कमेंट करून प्रश्न विचारताना दिसत आहेत. जेव्हा विराट भारतीय क्रिकेट संघात आपलं स्थान पक्कं करण्यासाठी मेहनत घेत होता. त्याचवेळी तो ब्राझिलियन मॉडेल आणि अभिनेत्री इजाबेलसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मिळालेल्या माहितीनुसार इजाबेल विराट हे दोघे एकमेकांवर फार प्रेम करत होते. अनुष्का शर्मासोबत रिलेशनशिपमध्ये येण्याआधी विराट दोन वर्ष इजाबेलला डेट करत होता. मात्र त्याच नात फार काळ टीकलं नाही. या दोघांनी आपलं नातं कधीच जाहीर केलं नव्हतं पण त्यांच्या ब्रेकअपनंतर इजाबेलनं एका मुलाखतीत याचा स्वीकार केला. ती म्हणाली, ‘आमचं एकमेकांवर प्रेम होतं. पण नंतर आम्ही एकामेकांच्या संमतीनंच वेगळे झालो.’ इजाबेल ही मूळची बाझीलच्या रोजारियो शहरातील असून इजाबेल लिटे एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिने अनेक भारतीय चित्रपट आणि जाहिरातींमध्ये काम केलं आहे. इजाबेलचा सोशल मीडियावर मोठी चाहता वर्ग आहे. इजाबेलनं बॉलिवूडच्या ‘पुरानी जीन्स’,’तलाश: द आंसर लाइज विदिन’ ‘सिक्सटीन’, या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच ती दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये ‘नरेंद्र’, ‘वर्ल्ड फेमस लव्हर’ आणि ‘मिस्टर मजनूं’ यात झळकली आहे. इजाबेल तिच्या सौंदर्यासाठी संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *