कॅप्टन कोहलीची ‘विराट’ कामगिरी

कोलकाता : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने नवा रेकॉर्ड केला आहे. हा रेकॉर्ड त्याने बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी दरम्यान केला आहे.
विराटने बांगलादेशविरोधात पहिल्या डावात दमदार शतकी कामगिरी केली. विराटचं कसोटी कारकिर्दीतलं हे 27 शतकं ठरलं. विराटने 136 धावा केल्या. विराटने या खेळीसह विक्रमाला गवसणी घातली आहे.
सर्वाधिक कमी डावांमध्ये कॅप्टन म्हणून 5000 धावा करण्याचा विक्रम विराटने केला आहे. 32 वी धावा घेताच हा विक्रम विराटच्या नावावर झाला.
विराटने कॅप्टन म्हणून अवघ्या 86 डावांमध्ये 5000 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. अशा प्रकारची कामगिरी करणारा विराट टीम इंडियाचा पहिला तर कसोटी क्रिकेट विश्वातला सहावा कॅप्टन ठरला आहे.
या रेकॉर्डमुळे विराट कोहली कॅप्टन म्हणून 5 हजार धावा करणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.
कमी डावात 5 हजार धावांचा टप्पा गाठणारे कॅप्टन
विराट कोहली – 86 डाव
रिकी पॉटिंग – 97 डाव
क्लाइव्ह लॉईड – 106 डाव
ग्रॅम स्मिथ – 110 डाव
ऍलेन बॉर्डर – 116 डाव