Thu. Apr 22nd, 2021

कोहलीचा नवा पराक्रम ICCच्या क्रमवारीत पाचव्या स्थानावर

अहमदाबाद येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव झाला. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारताचे स्टार फलंदाज अपयशी ठरले. या विजयामुळे इंग्लंडने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. भारताला हार पत्करावी लागली असली तरी, विराट कोहलीचे चाहते हे सुखावले आहेत. मागील काही दिवसांपासून विराटची बॅट शांत होती. मात्र, मागील दोन डावात विराटने अर्धशतके ठोकत टीकाकारांची तोंडे बंद केले आहे.

या कामगिरीसोबतच विराटने एका खास विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यामुळे विराटचे चाहते सुखावले आहे. नव्याने जाहीर झालेल्या फलंदाजांच्या आयसीसी टी-20 क्रमवारीत विराट पाचव्या स्थानावर आला आहे. या यादीत 744 गुण जमा झाले आहेत. एकदिवसीय क्रमवारीत तो प्रथम आणि कसोटीत पाचव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच, क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात तो अव्वल-5 फलंदाजांमध्ये आहे. त्यामुळे अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *